मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. १८ डिसेंबर झालेल्या भाजपा आणि शिवसेनेच्या बैठकीत भाजपाने १०२ जागांवर दावा केला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने १०९ जागांवर दावा केला.
भाजपाने २०१७ ला जिंकलेल्या सर्व ८२ जागांवर दावा केला आहे. तर भाजपाने २०१७ ला दुसर्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवरही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून १०९ जागांवर दावा करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेने जिंकलेल्या ८४ जागा जशाच्या तशा मागितल्या आहेत.
उर्वरित ७७ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
२११ पैकी १५० जागांवर दोघांची सहमती झाली असून त्यात १०२ जागा भाजपाकडे आणि उर्वरित शिवसेनेकडे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान उर्वरित ७७ जागांवर दोन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला आहे. शिवसेनेकडून करण्यात येणार्या दाव्यानुसार २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनाच एकमेव आधार मानण्यास भाजपाने नकार दिला आहे, कारण अनेक प्रभागातील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे, असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे.